E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बालेवाडी क्रीडा संकुलाच्या वाहनतळाचा मार्ग होणार मोकळा?
Wrutuja pandharpure
20 May 2025
पुणे
: पीएमआरडीचा विकास आराखडा रद्द झाल्याने अनेक सुधारणांना पुन्हा संधी मिळाली आहे. विशेषतः शहरालगत असलेल्या महाळुंगे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पीएमआरडीने परिसरातील जागा पार्किंगसाठी आरक्षित करावी अशी मागणी खुद्द क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक स्पर्धांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते .यानिमित्ताने येथे येणार्या प्रत्येकाला सध्या पार्किंगची समस्या भेडसावत आहे. परंतु भविष्यात येथे होणार्या सर्व क्रीडा स्पर्धांसाठी सुलभ पार्किंग व्यवस्था करण्यात यावी या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथे नव्वदच्या दशकात शिवछत्रपती क्रीडा संकुल उभारण्याचा प्रारंभ झाला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी या जागेवर आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. १९९३ मध्ये होणार्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनाचे यजमानपद राज्याकडे असल्याने त्या अनुषंगाने क्रिडा संकुलाची मागणी करण्यात आली होती.मुख्यमंत्री शरद पवार यांनी हि मागणी मान्य करुन व पवार यांच्या प्रयत्नातून म्हाळुंगे-बालेवाडीत तातडीने कमी कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. तब्बल१५१ एकर १४ गुंठे जागेत हे भव्य क्रीडा संकुल विकसीत करण्यात आले.यानंतर १९९४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा व पारितोषिक वितरण समारंभ तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.
या स्पर्धांच्या अनुषंगाने बाणेर रस्ताही चांगल्या प्रकारे तयार करण्यात आला होता. यानंतर क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांची रेलचेल वाढत गेली.परंतु सध्याची वाहनांची क्षमता पाहता या क्रीडा संकुलात पार्किंगची व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने क्रीडानगरी जवळील पुणे महानगर क्षेत्रिय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील व क्रीडा संकुलाच्या जवळील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
जागा आरक्षित करा
क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांची इनडोअर व आउट डोअर स्वतंत्र स्टेडियम आहेत. याठिकाणी स्वतंत्र अकादमी आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आणि शासकीय कार्यक्रमानिमित्त व्हीआयपी मंडळींचा येथे राबता असतो. क्रीडा स्पर्धांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी पार्किंग व सुरक्षिततेसाठी अनेक वाहने स्टेडियमकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूलाच पार्क केली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. भविष्याचा विचार करून आताच परिसरातील जागा आरक्षित करून पार्किंगची सुविधा निर्माण केल्यास मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
Related
Articles
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
30 May 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात